पाणीप्रश्‍नावरून पुंडलिकनगरात तणाव !

Foto


औरंगाबाद :  पुंडलिक नगर-हनुमाननगर परिसरात असलेल्या जलकुंभावरून  एन-3, एन-4, परिसराला वाहिनी जोडून पाणी देण्याकरीता भाजपा नगरसेवकांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने आठ दिवसात हे काम मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन संबंधितांना दिले होते. या कामाला पुंडलिक नगर परिसरातील नागरिकांनी आज सोमवारी हनुमान नगर चौकात आंदोलन करीत विरोध दर्शविला. यावेळी देणार नाही देणार नाही हक्काचे पाणी देणार नाही, पाणी आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे... नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी... आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.जायकवाडी करून शहरात येणारे पाणी कमी झाल्याने तसेच आहे त्या पाण्याचे नियोजन करण्यात प्रशासन आमदार सावे विरोधात घोषणाबाजी...
 
यावेळी आंदोलकांनी मनपा प्रशासनासह भाजप आमदार अतुल सावे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आमदार सावे बळाचा वापर करून हे काम करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आमच्याकरीता जशी आमच्या पदाधिकार्‍यांनी व्यवस्था केलेली आहे अगदी त्याप्रमाणे आमदार सावे यांनी सिडको एन-3,एन-4 येथील नागरिकांकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणीही आंदोलकांच्या वतीने अपयशी ठरत आहे. त्यामुळे शहराचा पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून विशेषतः सिडको-हडको भागात पाणी समस्या तीव्र आहे. अनेक वसाहतींमध्ये आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नुकतेच भाजप नगरसेविका माधुरी अदवंत यांनी पाणीप्रश्‍नासाठी एन-5 येथील जलकुंभावर आंदोलन केले होते. त्यानंतर पुंडलिकनगर परिसरातील हनुमाननगर येथील  जलकुंभावरून एन-3, एन-4, परिसराला वाहिनी जोडून पाणी देण्याचे काम येत्या आठ दिवसात मार्गी लावण्याचे आश्‍वासन संबंधितांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते.